Brutal murder in ​​Malkapur : मलकापूरातील धरणगाव परिसरात तृतीय पंथीची निघृण हत्या 

Brutal murder in ​​Malkapur

Brutal murder in ​​Malkapur : तालुक्यातील धरणगाव शिवारात एका तृतीयपंथीयाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना 7 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस अली. या घटनेने मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली असून सदर तृतीय पंथीच्या हत्यारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिस विभागासमोर उभे ठाकले आहे.

Brutal murder in ​​Malkapur

मलकापूर :  तालुक्यातील धरणगाव शिवारात एका तृतीयपंथीयाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना 7 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस अली. या घटनेने मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली असून सदर तृतीय पंथीच्या हत्यारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिस विभागासमोर उभे ठाकले आहे.  घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून मारेकऱ्यांचा पोलिस युध्द पातळीवर शोध घेत असल्याचे दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार,  मलकापूर धुपेश्वर दरम्यान धरणगावजवळ महामार्गाच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात तृतीयपंथीयाचा मृतदेह 7 जानेवारी रोजी सकाळी आढळून आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयाच्या डोक्यावर, मानेवर मारहाणीच्या खुणा आहेत, रक्ताचे ओघळ आहेत. अत्यंत निर्घृणरित्या ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (खामगाव) अशोक थोरात यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. यासंदर्भात संपर्क केला असता, मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांनी अधिक काही सांगण्यास नकार दिला. वरिष्ठ अधिकारी आणि पथके घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. यामुळे घटनास्थळ परिसरात बघ्याची एकच गर्दी उसळली. या हत्येबद्दल विविध तर्क लावले जात आहे. पोलिसांकडून सदर तृतीयपंथीचे नावही सांगण्यात आलेले नाही. तर वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »