बुलढाणा : शिर्डी येथे 8 व 9 फेब्रुवारी रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपुर इथून निघालेल्या सहकार दिंडीचे 31 जानेवारी रोजी जिल्ह्यात आगमन झाले.


बुलढाणा : शिर्डी येथे 8 व 9 फेब्रुवारी रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपुर इथून निघालेल्या सहकार दिंडीचे 31 जानेवारी रोजी जिल्ह्यात आगमन झाले.
रिसोड मार्गे 31 जानेवारी रोजी मेहकर येथे सहकार दिंडीचे आगमन झाले. यावेळी मेहकर येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सहकार दिंडीचे स्वागत केले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्यासह काय करायचं सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला.
दरम्यान एक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता चिखली रोडवरील साई लॉन्स येथून दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी विविध पतसंस्थांचे चित्ररथ दिंडीत सहभागी झाले होते. तर फेटे बांधून पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी काढलेली दुचाकी रॅली लक्षवेधून घेत होती. चिखली रोडवरील त्रिशरण चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, जयस्तंभ चौक मार्गे संगम चौकातील छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकापुढे सहकार दिंडीचा समारोप करण्यात आला. येथे शाहिरांनी आपल्या कवणातून शिवरायांची गौरव गाथा प्रस्तुत केली. तत्पूर्वी जयस्तंभ चौकातील महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. जय सहकार च्या घोषणा देत दिंडी सहभागी सहकार चे वारकरी सहकाराचा जागा करीत होते. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी दिंडीमध्ये फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. संगम चौकातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर दिंडीत सहभागी सहकार वारकऱ्यांच्या हस्ते दैनिक महाभुमीच्या सहकार भूमी या विशेष पेजचे प्रकाशन करण्यात आले.