मलकापूर : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी तसेच अवैध रेती व्यवसाय सुरू ठेण्यासाठी एप्रिल व मे महिन्याचे प्रत्येकी आठ हजार रुपये असे एकूण सोळा हजार रुपयांची लाचेची मागणी करून 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स.पो.उप.नि गजानन माळी यास लाचलुचपत अकोला विभागाने मलकापूर येथे रंगेहाथ पकडल्याची घटना 23 मे रोजी सायंकाळी घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेती वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदार यास बुलढाणा एल.सी.बी चे स.पो.उप.नि गजानन माळी यांनी तक्राराच्या ताब्यातील टिप्पर रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरिता माहे एप्रिल व मे महिन्याचे प्रत्येकी रुपये 8 हजार असे एकूण 16 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराला आरोपी लोकसेवकाने मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लोकसेवक गजानन माळी याचे विरुद्ध कारवाई करण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे 13 मे रोजी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून 13 मे रोजी नांदुरा रोडवरील मुंधडा पेट्रोल पंपा नजीक शिवनेरी ढाबा येथे लाच मागणी पडताळणी करण्यात आली. सदर लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान गजानन माळी यांनी तक्रारदाराकडे पंचायत समक्ष तडजोडी अंती 14 हजार रुपयाची लाच रकमेची मागणी केली. त्यानंतर 23 मे रोजी शिवनेरी ढाबा मुंधडा, पेट्रोल पंप जवळ येथे रचण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान गजानन देवचंद माळी यांनी रक्कम पंचा समक्ष स्वीकारले त्यावरून नमूद आरोपीस लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन मलकापूर शहर जिल्हा बुलढाणा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र, सचिन शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, यांनी मार्गदर्शनात सापळा अधिकारी मिलिंद कुमार ब्रह्मकर पोलीस उपअधीक्षक, पोलिस अंमलदार प्रदीप गावंडे ,दिगंबर जाधव, संदीप ताले, असलम शहा सर्व रा.अकोला यांनी पार पाडली.