मोबाईल पाण्यात टाकल्याचा राग अनावर ; तेरा वर्षांच्या बालकाने डोक्यात घातला दगड ! 

घनसावंगी : शेतातील पाटाचे पाणी अडविले म्हणून आणि हातातील मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याचा राग अनावर झाल्याने एका तेरा वर्षांच्या मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली टेंभी येथे ही घटना घडली. या गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

   आंतरवाली टेंभी येथील मिराबाई ऊर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे ( 41 ) असे मयत महिलेचे नाव आहे. 

    शेतामध्ये काम करीत असताना  डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मयत मिराबाई यांचा भाऊ अंकुश सदाशिव औटे (रा.आपेगांव ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर ) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द तिर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या  माहितीच्या आधारे व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका 13 वर्ष 6 महिने वयाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. या बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

 ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि  साजिद अहेमद, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, मपोउपनि. प्रतिभा पठाडे, तिर्थपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार नारायण माळी, पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीष श्रीवास, आक्रूर धांडगे, इर्शाद पटेल,कैलास चेके, रमेश काळे, सौरभ मुळे, तिर्थपुरी पोलीस ठाणेचे होमगार्ड धनंजय पवार यांनी केली. 

मोबाईल पाण्यात टाकल्याचा राग 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी वांरवार अडवणे व विधीसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल मयत महिलेने पाण्यात टाकुन खराब केल्याचा राग मनात धरुन 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास विधीसंघर्षग्रस्त बालकाने महिला दुपारच्या वेळी तिच्या शेतामध्ये झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड ठार मारल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »