संग्रामपूर : तालुक्यातील वानखेड गावातील एका इसमाने त्याच्या पत्नीशी भांडण झाल्याने जवळपास पंधरा वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. अनेकदा त्याने पत्नीला परत आणून द्या म्हणून पोलिसात निवेदनही दिलेत. मात्र पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेर या इसमाने हातोड्याने शेगाव – वानखेड या बसच्या मागच्या काचा फोडल्याची घटना 1 एप्रिल रोजी सकाळी वानखेड गावात घडली.

याबाबत बसचालक वाल्मीक तुकाराम इंगळे यांनी तामगांव पोलीसात फिर्याद दिली की, 1 एप्रिल रोजी सकाळी शेगाव आगाराची बस क्रमांक एम एच 40 एन 8716 ही बस प्रवाशांना घेवून शेगाव येथून वानखेडकरिता निघाली होती. दरम्यान वानखेडे येथे सकाळी आठ वाजता पोहोचून ग्रामपंचायत समोर गाडी परत शेगाव जाण्याकरता वळून ग्रामपंचायत समोर थांबले असता मागील बाजूचा काच फुटल्याचा आवाज झाल्याने फिर्यादी बस चालक यांनी उतरून पाठीमागे जाऊन पाहिले असता वानखेड येथील प्रकाश पांडुरंग पिंजरकर हातोडा घेऊन उभा होता. त्यावेळी त्याला विचारपूस केली असता तो म्हणाला की माझे नाव प्रकाश पांडुरंग पिंजरकर आहे. मी वानखेडे येथील रहिवासी आहे, मीच काच फोडला आहे. मला न्याय पाहिजे तेव्हा मी जमलेल्या लोकांना याचे बाबत विचारले असता फिर्यादी यांना समजले की त्याची पत्नी मागील पंधरा वर्षापासून त्याला सोडून गेली आहे. त्याची मनस्थिती ठीक नाही. रागाचे भरात मला न्याय पाहिजे असे म्हणून हातोड्याने काही कारण नसताना बसची मागील बाजूची काच फोडून बसचे अंदाजे आठ हजार रुपयांचे नुकसान केले. अशी फिर्याद बसचे चालक वाल्मीक तुकाराम इंगळे यांनी तामगाव पोलिसात तक्रार दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी प्रकाश पिंजरकर याचेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.