dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

डोढ्रा येथे पती पाठोपाठ पत्नीनेही सोडले प्राण; एकाच चितेवर दोघांनाही चिताग्नी

अंढेरा : सात जन्माची गाठ बांधलेल्या पतीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. आभाळाएव्हढे ते दु:ख सहन न झाल्याने पत्नीनेही त्यांच्या पाठोपाठ प्राण त्यागले. ही करूणादायी घटना देऊळगाव राजा तालुक्यातील डोढ्रा येथे शनिवारी घडली. दरम्यान या वृध्द दांम्पत्यावर एकाच चितेवर चिताग्नी देण्यात आला.

 डोढ्रा येथील शेतकरी मोतीसिंग फत्तेसिंग परिहार  वय ७५ यांना शनिवारी  सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. काही क्षणातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ही बातमी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंना कळताच त्यांच्या मनावर जबरदस्त आघात झाला अन् त्यांच्याही हृदयाची गती थांबली. संपूर्ण गावासाठी आदर्श असलेले हे दांपत्य आयुष्यभर एकमेकांच्या सावली सारखे होते. मोतीसिंग परिहार हे माळकरी मंडळीचे आधारस्तंभ होते. ढोड्रा येथील प्राचीन शनी मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन वाहिले होते. सामाजिक राजकीय आणि संप्रदायिक क्षेत्रात त्यांचे नाव मोठे आदराने घेतले जायचे. अन्नपूर्णाबाई पतीच्या कार्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत असल्याने  हे दांम्पत्य गावकऱ्यांसाठी आदर्श होते. या दांम्त्याने प्रेम, सेवा व समर्पणाचा आदर्श ठेवला आहे. त्यांनी गावासाठी केलेली सेवा आणि निष्ठा कायमच गावकऱ्यांच्या स्मरणात राहील अशा भावना गावकरी व्यक्त करीत आहेत. परिहार दांम्पत्याच्या एकाकी जाण्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top