कारंजा : शनिवार १२ जुलै रोजी अदिती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी म. बुलढाणाच्या ६४ व्या कारंजा (लाड) नूतन शाखेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर.एम.पाटील, स्वा.से.श्री.क.रा. ईत्राणी महाविद्यालय कारंजा यांच्या हस्ते झाले.

लोकहिताला वाहून घेणे हेच आमचे सहकार धोरण : सुरेश देवकर
कारंजा : पैशांचे मूल्य आणि महत्त्व याचे जाण आणि भान असल्यामुळे गत 22 वर्षांपूर्वी अदिती अर्बनची स्थापना केली. या प्रवासात असंविधानिक तसेच असामाजिक कामाला कधीही थारा दिला नाही. निरपक्षपणे काम करत आल्यामुळे आज रोजी संस्थेच्या 64 शाखा, शेकडो कर्मचारी, एक हजार कोटींच्या ठेवीकडे वाटचाल, लाखो सभासद, महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र इथपर्यंत प्रवास येऊन पोहचला आहे. लोकहिताला वाहून घेण्याच्या अदिती अर्बनच्या सहकार धोरणामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी केले.
शनिवार १२ जुलै रोजी अदिती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी म. बुलढाणाच्या ६४ व्या कारंजा (लाड) नूतन शाखेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर.एम.पाटील, स्वा.से.श्री.क.रा. ईत्राणी महाविद्यालय कारंजा यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेश देवकर बोलत होते. याप्रसंगी विचारपीठावर
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक जाधव,श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा, मुख्याध्यापक परेशसिंह ठाकूर विश्वभारती विद्यालय, प्रभारी मुख्याध्यापक भगवान जाधव रा.ला.न.प. माध्यमिक कन्या विद्यालय, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी सुधाकर नारायण जाधव , अदिती अर्बनचे उपाध्यक्ष दिनकराव चिंचोले संचालक संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याला संस्थेचे सभासद भगत सर, कापसे सर, ठोंबरे काका, शेजोळ सर, लोखंडे सर व असंख्य ठेवीदार यांची विशेष उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना सुरेश देवकर म्हणाले की, सहकाराला काचेचे घर म्हणून संबोधले जाते. मात्र काचेच्या घराला दगड मारण्याची पाळी बँकांनी आपल्यावर येऊ देऊ नये. आजतागायत पारदर्शक व्यवहाराला प्राधान्य देऊन अदिती अर्बनने नाते विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे घेऊन सहकारावरील लोकांचा विश्वास वृद्धिंगत केला आहे.
यावेळी सरव्यवस्थापक शैलेंद्र मुळे, तलाठी अभिजीत पाटील, विभागीय व्यवस्थापक पंकज शेजोळे, अनिरुद्ध गायकवाड, प्रदीप पडघान,सुनील कानडजे विशेष वसुली अधिकारी समाधान गवई, मुख्य वसूली अधिकारी दिपक निकम, व्यवस्थापक अमर आढाव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपाध्यक्ष दिनकराव चिंचोले यांनी अदिती अर्बनची वाटचाल विशद केली. सूत्रसंचालन प्रा. शशिकांत जाधव यांनी केले तर आभार विभागीय व्यवस्थापक प्रा. राजू वैद्य यांनी मानले. या कार्यक्रम सोहळ्याला मेहकर शाखा व्यवस्थापक ओम निकम,रिसोडचे अरविंद गाभणे, योगेश्वर गायकवाड, यश वकोडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना परिश्रम घेतले.
समृद्धी संपन्नता विशालता याचे नाव अदिती : प्राचार्य डॉ. पाटील
शिक्षकी व्यवसायाची पार्श्वभूमी असताना सुरेश देवकर सरांनी सहकार क्षेत्रात मिळवलेले यश नेत्रदिपक आहे. सृजनात्मक, रचनात्मक आणि विकासात्मक कामांचा त्यांनी घेतलेला ध्यास दखलपात्र ठरतो.समृद्धी, संपन्नता, विशालता याचे नाव अदिती अर्बन असल्याचे गौरवोद्गार उद्घाटक प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील यांनी काढले.