Action of Anti-Terrorism Squad: हातात तलवार घेऊन दहशत माजविणारा ‘कालीचरण’ अटकेत

Action of Anti-Terrorism Squad: 'Kalicharan' who terrorized with a sword in his hand arrested

Action of Anti-Terrorism Squad:जालना शहरातील चंदनझीरा भागात हातात तलवार घेवुन दहशत माजविणारा कालीचरण गायकवाड याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने आज 13 एप्रिल रोजी केली.

Action of Anti-Terrorism Squad: 'Kalicharan' who terrorized with a sword in his hand arrested
Action of Anti-Terrorism Squad: ‘Kalicharan’ who terrorized with a sword in his hand arrested

माहोरा (जालना) : जालना शहरातील चंदनझीरा भागात हातात तलवार घेवुन दहशत माजविणारा कालीचरण गायकवाड याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने आज 13 एप्रिल रोजी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाण यांच्या आदेशान्वये दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे आज 13 एप्रिल रोजी गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, चंदनझीरा सुंदर नगर भागात एक व्यक्ती धारदार शस्त्र तलवार स्वतः जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण करत आहे. अशा खात्रीलायक माहितीनंतर पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक मोईन खान, यासीन गुलाम दस्तगीर, पोलीस हेडकाँस्टेबल मारोती शिवरकर, विनोद गडधे, पोलीस काँन्स्टेबल अभिजीत अडियाल यांनी दोन पंचानासोबत घेवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सुंदर नगर, चंदनझीरा भागात जावुन त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यास पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले असता त्याने कालीचरण सुखलाल गायकवाड (22, रा. हनुमान मंदीरजवळ, सुंदरनगर, चंदनझीरा) असे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यात असलेली धारदार तलवार (किमत 10 हजार) जप्त करुन त्यास पुढील कारवाईसाठी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये येथे देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »