नायलॉन मांजाने गळा कापला; अकोल्यात एकाचा मृत्यू

अकोला : चायनीज मांजामुळे गळा कापल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अकोल्यात घडली.  किरण प्रकाश सोनोने असे मृत व्यक्तीचे नाव असून ते अकोट फैल येथील रहिवासी होते.

अकोला : चायनीज मांजामुळे गळा कापल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अकोल्यात घडली.  किरण प्रकाश सोनोने असे मृत व्यक्तीचे नाव असून ते अकोट फैल येथील रहिवासी होते.

मकर संक्रांती निमित मंगळवारी अकोल्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान बंदी नंतरही नायलॉन मांजाचा सर्रास वापर करण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. नायलॉन मांजामुळे गळा कापल्याच्या काही किरकोळ घटना दिवसभरात घडल्या. मात्र अशाच एका घटनेत अकोट फैल येथील रहिवासी किरण प्रकाश सोनवणे यांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब मंगळवारी सायंकाळी समोर आली.  ते दुचाकीने जात असताना नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा कापल्या गेला. या घटनेनंतर पोलीसांनी त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहीती आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »