Accident on Kannada-Kishor road: रसवंती साठी लागणारा ऊस घेऊन कन्नड कडे जात असलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात चार जण ठार तर 13 जण जखमी झाले. हा अपघात सोमवार, 10 मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कन्नड ते पिशोर रस्त्यावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कन्नड : रसवंती साठी लागणारा ऊस घेऊन कन्नड कडे जात असलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात चार जण ठार तर 13 जण जखमी झाले. हा अपघात सोमवार, 10 मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कन्नड ते पिशोर रस्त्यावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन महारु चव्हाण, किसन धर्म राठोड, मनोज नामदेव चव्हाण, कृष्णा मूलचंद राठोड ,सर्व राहणार सातकुंड तालुका कन्नड असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर इंदरचंद प्रेमचंद चव्हाण, ज्ञानेश्वर देविदास चव्हाण, सचिन भागिनाथ राठोड, राहुल नामदेव चव्हाण, रवींद्र नामदेव राठोड, सागर भागिनाथ राठोड, सर्व राहणार सातकुंड तालुका कन्नड, इस्माईल अब्दुल जेडा ,उमर मुसा जेडा, दोघे राहणार गुजरात अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. कन्नड तालुक्यात सध्या ऊस तोडीचे काम सुरू असून अनेक ठिकाणचे ऊस हा रसवंतीसाठी जात असल्याने मजुरांनी रविवारी तोडलेला ऊस ट्रक मध्ये भरून ते सर्व कन्नड कडे येत होते. त्यापैकी काही मजूर ट्रकच्या केबिनमध्ये बसले होते. तर काहीजण उसाच्या वर बसले होते. कन्नड किशोर रस्त्यावरील खाडी चंदन नाल्याजवळ आल्यावर ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उलटला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर कन्नड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमींना उपचारासाठी कन्नड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात ठार झालेले चारही मजूर हे उसाखाली दबल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.