dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मतदानासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला: १५ जण जखमी

जालना : जालना शहरात मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जालना : जालना शहरात मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सरस्वती भुवन परिसर, शनी मंदिर परिसर तसेच काली मज्जिद परिसरात मतदानासाठी जात असलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. एका मागोमाग एक नागरिकांना चावा घेत या कुत्र्याने परिसरात दहशत निर्माण केली. काही जणांच्या पायांना गंभीर जखमा झाल्या असून एका जणाच्या हाताच्या करंगळीला इजा झाली आहे.

या घटनेनंतर जखमी नागरिकांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष देवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांनाही कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती असून, रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरात वाढलेल्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तात्काळ या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

जखमी नागरिकांची नावे

शिवराज गणेश वेव्हारे, शेख मोबीन

तारेख सुबानी,

पूर्वेस कृष्णा सुपारकर,

नासेर चाऊस,

राजश्री कसबे,

शेख रीहान,

सैय्यद सलादीन,

अमिनोदिन शेख,

मोहसिन कुरेशी

आसिफ कुरेशी,

संगीता अशोक साळवे,

स्नेहा श्रीनिवास येमुल,

शेख अतिक. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top