बुलढाणा ब्रेकिंग : तरुणी रात्री दवाखान्यात भरती, सकाळी मृत्यू; नातेवाईकांच्या आक्रोशानंतर डॉक्टर काय म्हणाले? 

बुलढाणा:  मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेली १७ वर्षीय सेजल नावाची तरुणी बुधवारी रात्री बुलढाणा येथील न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये भरती झाली, तिच्यावर उपचार सुरू असतानाच सकाळी तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. या सगळ्या घटनेनंतर डॉक्टरांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. 

बुलढाणा:  मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेली १७ वर्षीय सेजल नावाची तरुणी बुधवारी रात्री बुलढाणा येथील न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये भरती झाली, तिच्यावर उपचार सुरू असतानाच सकाळी तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. या सगळ्या घटनेनंतर डॉक्टरांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. 

त्यानुसार, बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास सेजल नावाची १७ वर्षीय मुलगी बुलढाणा येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये  भरती झाली.  त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. ती दोन तासापासून बेशुद्ध असल्याचे तिच्या आईने डॉक्टरांना सांगितले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना इतर ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात यावे असेही सांगण्यात आले होते. परंतु आमची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे तातडीने उपचार इथे सुरू करा, असा आग्रह नातेवाईकांचा होता. अशी माहिती देताना डॉ. वाघ पुढे म्हणाले की, हीच  मुलगी माझ्याकडे काही महिन्यांपूर्वी आली असता तिला  मेंदूतील कॅन्सरचे निदान झाले होते. परिस्थिती नाजूक असल्याने नातेवाईकांनी सदर मुलीवर मुंबई येथे शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तिच्यावर औषधोपचार सुरू होता.  परंतु, बुधवारी रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले तेव्हा,  नातेवाईकांना विचारले असता मुलीने औषधे किती घेतली व कसे घेतली? हे कळू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच, १५ जानेवारी गुरुवार रोजी सकाळी पेशंटची प्रकृती रात्री प्रमाणेच होती. परंतु ब्लड प्रेशर वाढल्याने, नातेवाईकांनी हॉस्पिटल मधील सिस्टर ला आवाज दिला, त्यानंतर मी निघालो. यादरम्यानच मुलीचे निधन झाले, रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त करत अडथळा निर्माण केला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी ते दाखल झाले. 

थोड्या वेळानंतर आणखी काही नातेवाईक त्या ठिकाणी जमले, रुग्णाच्या प्रकृतीची पार्श्वभूमी माहिती असल्याने तसेच उपचाराविषयी माहिती असल्याने इतर नातेवाईकांनी  मृतक मुलीला घराच्या दिशेने रवाना केले होते, असे न्यूरॉन हॉस्पिटलचे  डॉ. निलेश वाघ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »