A trader in Chhatrapati Sambhaji Nagar was cheated of five crores: छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्याची पावणेपाच कोटीने फसवणूक

A trader in Chhatrapati Sambhaji Nagar was cheated of five crores: शहरातील व्यापाऱ्याची दिल्ली आणि कोलकत्ता स्थित असलेल्या आरोपींनी तब्बल 4 कोटी 75 लाख 55 हजार 917 रुपयांनी फसणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्याची पावणेपाच कोटीने फसवणूक
छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्याची पावणेपाच कोटीने फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील व्यापाऱ्याची दिल्ली आणि कोलकत्ता स्थित असलेल्या आरोपींनी तब्बल 4 कोटी 75 लाख 55 हजार 917 रुपयांनी फसणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा परिसरातील रहिवासी श्याम त्रिलोकचंद अग्रवाल (45) यांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, एस्काय यार्न टेक्स प्रा.लि. दिल्ली आणि कोलकत्ता या फर्मचे संचालक अमित सैगल, सरोज सैगल आणि कविता मेहरा सैगल (सर्व रा. दिल्ली आणि कोलकत्ता) यांनी फिर्यादी श्याम अग्रवाल यांचे रामानूज कॉटन कॉर्पोरेशन या फर्मचे एकूण 97 लाख 20 हजार 837 रुपये, रिद्धी सिद्धी कॉटेक्स प्रा.लि. या फर्मचे एकूण 73 लाख 78 हजार 299 रुपये आणि सिद्धी फायबर्स प्रा. लि. या फर्मचे 34 लाख 95 हजार असे 2 कोटी पाच लाख 95 हजार 53 रुपये आणि त्यावरील व्याज 2 कोटी 69 लाख 60 हजार 198 रुपये अशी एकूण 4 कोटी 75 लाख 55 हजार 251 रुपये फिर्यादीला देणे बाकी असताना त्यांनी संगणमताने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन रक्कम फिर्यादी श्याम अग्रवाल यांना देणे बाकी नसल्याचे खोटे सांगितले. हे दर्शविण्यासाठी त्यांच्या फर्मचे खोटे व बनावट लेजर बुक तयार करुन त्यावर खोट्या नोंदी घेऊन फर्मची एकूण 4 कोटी 75 लाख 55 हजार 251 रुपये रक्कमेची आर्थिक फसणूक केली. तेव्हा मे. एसके यार्न टेक्स प्रा. लि. दिल्ली आणि कोलकत्ताचे संचालक अमित सैगल, सरोज सैगल आणि कविता मेहरा या तिघांविरुद्ध सिडको पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 406, 420, 467, 468, 471 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करुन फसवणूक

शहरातील एका व्यापाऱ्याची पावणेपाच कोटी रुपयांनी फसणूक केल्याची घटना ताजी असतानाच एमजीएम महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर असलेल्या आयुशी राजकुमार जैन यांची दोन अनोळखी व्यक्तींनी संगणमताने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करुन लबाडीच्या उद्देशाने एक लाख 83 हजडार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 419, 420 अन्वये गुन्हगा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »