
फुलंब्री : भटिंडा (पंजाब) येथे आरोग्यसेवेच्या कर्तव्यात कार्यरत असलेले फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील रहिवासी अमोल चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी सुनीता आणि दोन मुलं अडकले. पाकिस्तानकडून हवाई हल्याचा प्रयत्न होत असतांना या प्रसंगाची माहिती मिळताच सा.बा.विभाग पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी अरोग्य सेवक अमोल चव्हाण यांच्या कुटूंबाला सुखरूप बाबरा येथील घरी पोहोचवले. दरम्यान अभियंता चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश आल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावचे सुपूत्र अमोल चव्हाण भटिंडा (पंजाब) येथे आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. युध्दजन्यपरिस्थतीत त्यांना सुट्टी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी किमान आपल्या कुटूंबियांना गावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची विनंती अभियंता अतुल चव्हाण यांंना दुरध्वनीवरून केली. त्यानंतर लागलीच अभियंता चव्हाण यांनी अमोल यांची पत्नी सुनीता मुलं विराट आणि त्रिशान यांना माणुसकीच्या नात्याने दिल्लीमार्गे शिड आणि छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षित पोहोचवविण्याची व्यवस्था केली. दरम्यान “आपल्या सहकार्यामुळे माझं कुटुंब सुरक्षित घरी पोहोचू शकलं, मी आपला ऋणी आहे“ अशी प्रतिक्रिया अरोग्यसेवक अमोल चव्हाण यांनी दिल्याची माहिती अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.