dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ओडिशात चार्टर्ड विमान कोसळले; सहा जण जखमी 

राउरकेला :  ओडिशातील राउरकेला हवाई तळापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एक नाईन-सीटर विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या अपघातात पायलटसह सहा जण जखमी झाले असून पायलटची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

राउरकेला :  ओडिशातील राउरकेला हवाई तळापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एक नाईन-सीटर विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या अपघातात पायलटसह सहा जण जखमी झाले असून पायलटची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

भुवनेश्वरहून राउरकेलाकडे जाणाऱ्या या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती लक्षात घेता पायलटने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र टेकऑफनंतर सुमारे १० किलोमीटर अंतरावर, जालदा परिसरात हे विमान कोसळले. दुपारी १.१५ वाजता राउरकेला येथे लँडिंग होणार होते, त्याआधीच ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोठी हानी टळली

या विमानात एकूण सहा जण प्रवास करत होते. यामध्ये चार प्रवासी तसेच कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांचा समावेश होता. अपघातात सर्व सहा जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या तीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही बचावकार्यात मदत केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला होता. विमान अत्यंत कमी उंचीवर आले होते, मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर ते थेट जमिनीवर कोसळले. घटनास्थळी झाडे असल्याने विमान त्यात अडकले असते, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने या अपघातातून सर्व प्रवासी बचावले असून मोठी हानी टळली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top