मंगरूळपीर : शहरातील मंगलधाम झोपडपट्टी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली आहे.

फिर्यादी वैभव ज्ञानेश्वर खाडे (२३, रा. मंगलधाम झोपडपट्टी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरावरील विद्युत तारेवर पतंगाचा धागा अडकला होता. तो धागा हटवताना विजेची तार तुटून नुकसान होऊ शकते असे सांगितल्याने आरोपी कार्तिक गजानन गायकवाड (२०), गीता गजानन गायकवाड आणि दोन अल्पवयीन मुलांशी वाद झाला. वाद वाढताच आरोपी कार्तिक गायकवाड यांनी फिर्यादीचे वडील ज्ञानेश्वर खाडे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चार आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून कार्तिक गायकवाडला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.