छत्रपती संभाजीनगर : मानवत आणि पाथरी तालुक्यातील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खान अब्दुल खान उर्दू प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच पाथरी आणि मानवत तालुक्यातील संस्थाचालकांनी बेकायदेशिररित्या शिक्षकांची भरती करुन शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संस्थाचालकाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मानवी हक्क अभियानाच्या वतीने बुधवार, 8 ऑक्टोबर पासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी शिक्षण उपसंचालकांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

मानवत तालुक्यातील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या खान अब्दुल खान उर्दू प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच पाथरी आणि मानवत तालुक्यातील शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांची भरती करण्यावर बंदी असतानाही शिक्षकांची भरती करुन कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केली होती. बेकायदेशिररित्या शिक्षकांची भरती करणाऱ्या संस्थाचालकावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा समन्वयक रघुनाथ कसबे, पाथरी तालुकाध्यक्ष भीमाशंकर वैराळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप हिवाळे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेवून विभागीय शिक्षण उपसंचालक विभागाचे सहाय्यक शिक्षणाधिकारी भारत पालवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा समन्वयक रघुनाथ कसबे, पाथरी तालुकाध्यक्ष भीमाशंकर वैराळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप हिवाळे यांनी आपले उपोषण स्थगित केले.