Car accident on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर कारचा अपघात; चौघे गंभीर जखमी

Car accident on Samruddhi Highway

Car accident on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चौघे गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक १६४ येथे, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.४४ वाजताच्या सुमारास झाला.

Car accident on Samruddhi Highway
वाशिम : समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चौघे गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक १६४ येथे, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.४४ वाजताच्या सुमारास झाला.
नागपूरहून मुंबईकडे जात असलेली टाटा अल्ट्रोझ कार (क्र. एमएच-४०-सीए-७३०४) ही वेगाने जात असताना चालकाला अचानक झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या मधोमध असलेल्या मिडियन काँक्रीट बॅरिअरवर जोरदार आदळली. या धडकेत वाहनाचा पुढील भाग चेंदामेंदा झाला. अपघातात चालक अभिजित रमेश वरधे (वय ३५, रा. नागपूर) यांना किरकोळ दुखापत झाली असून कारमधील इतर चार सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सर्वांना समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन सेवांच्या अॅम्ब्युलन्सच्या मदतीने कारंजा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र पोलीस केंद्र अमाणीचे प्रभारी अधिकारी एपीआय नितीन दांदडे, तसेच पोलीस कर्मचारी, एमएसएफ स्टाफ घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. कार अपघातग्रस्त अवस्थेतून टोईंग करून रस्त्याच्या मिडियनमध्ये सुरक्षित लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »