शिवसेनेच्या वतीने विभागीय 11 ऑक्टोबरला आंदोलन; हंबरडा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे: आंबादास दानवे 

जालना :  मागील अनेक दिवसात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत हातबल झाला आहे. अशा प्रचंड बिकट परिस्थितीत शासनाच्या वतीने केवळ पाहणी दौरे आयोजित करण्यात येत असून आजपर्यंत शेतकऱ्याला प्रत्यक्ष कवडीचीही मदत झालेली नाही. 

जालना :  मागील अनेक दिवसात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत हातबल झाला आहे. अशा प्रचंड बिकट परिस्थितीत शासनाच्या वतीने केवळ पाहणी दौरे आयोजित करण्यात येत असून आजपर्यंत शेतकऱ्याला प्रत्यक्ष कवडीचीही मदत झालेली नाही. 

या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करावे. आपत्तीग्रस्त भागातील पशुधन व पडलेली घरे यांनाही मदत करावी या मागण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार आहेत. या मोर्चात हजारोच्या संख्येने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवार, 5 ऑक्टोबर रोजी जालना येथील शिवसेना भवन येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, महेश नळगे, भानुदास घुगे, रमेश गव्हाड, भगवान कदम, मुरलीधर शेजुळ, मनीष श्रीवास्तव, हनुमान धांडे, देवनाथ जाधव, मुरलीधर थेटे, शहर प्रमुख बाला परदेशी,  मंगल मेटकर, गंगू वानखेडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती . 

     पुढे बोलताना दानवे म्हणाले की, राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत असतानाही राज्य शासन त्याला कोणतीही मदत करण्याची ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. केवळ कोरडी आश्वासने देऊन व शब्दांचे फवारे उडवून चालणार नाही. त्यामुळे अशा या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या हंबरडा मोर्चास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.

 सत्तेत असताना मदत केली

 जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष सत्तेत नसतानाही केवळ पाहणी करणे, फोटो काढणे असे कार्यक्रम न करता पक्षाने नागरिकांना अल्प स्वरूपात का होईना, परंतु थेट मदत देण्याचा प्रयत्न केला. अनेक नागरीवस्त्या झोपडपट्ट्यांत पाणी घुसले तेव्हा तेथील नागरिकांना पुरी भाजी, खिचडी, अन्नधान्याच्या किट अशी मदत करून नागरिकांना धीर देण्याचे काम केले. 

आपत्ती कोणतीही असो त्यात सर्वात अगोदर मदत शिवसेनेच्या वतीनेच करण्यात येते.  गोदाकाठच्या गावातही पूरपरिस्थितीत अत्यंत धडाडीने नागरिकांना मदत करण्यात सर्वात पुढे शिवसैनिकच होते.  मात्र, आताचे सरकार केवळ पाहणी दौरे करून वेळकाढूपणा करत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. 

–  भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »