परभणीत धनगर समाजाचा रास्ता रोको

परभणी :  धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी शहरातील पेडगाव फाटा येथे समाज बांधवांच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

परभणी :  धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी शहरातील पेडगाव फाटा येथे समाज बांधवांच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

जालना येथे धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाज बांधव दीपक बोऱ्हाडे मागील पंधरा दिवसांपासून उपोषण करीत आहे. त्यांच्या उपोषणस्थळी राज्याचे मंत्री व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देवून बोऱ्हाडे यांच्यासोबत चर्चा केली. परंतु अद्याप समाजाच्या मागणी संदर्भात शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे परभणी येथील समाज बांधवांनी बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी व आपल्या प्रमुख मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन दिले. बुधवारी जिल्ह्यातील समाज बांधवांनी एकत्र येत दुपारी पेडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात भारत निळोबा आव्हाड, मुंजाभाऊ बालासाहेब गायकवाड, नालेराव दगडाबा वरकड,  ज्ञानदेव बोडुरंग मान्हाड, घनशाम बापुराव आबाड, रामा बाळासाहेब पुंड, विश्क कोंडीराम मुंजारे, बबनराव देवराव जमाडे, अशीराव सखाराम जमाई, बबनराव जुंबडे, भागवतराव जगाई, भागवल लक्ष्मणराव जगार व सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »