बुलढाण्यात मालवाहू वाहन उलटले; चालक किरकोळ जखमी! 

बुलढाणा :  खाजगी कंपनीचे साहित्य घेऊन जाणारे मालवाहू वाहन शहरातील धाड नाका परिसरातील दिव्यांग पुनर्वसन संस्थेसमोरील वळण रस्त्यावर उलटले.  मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी  दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

  इंदोरहून छत्रपती संभाजीनगरकडे एम.पी.०९, जी.एच. ९१५६ क्रमांक असलेली पिकअप  निघाली  होती. दरम्यान,  बुलढाण्यातील धाड नाका परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.   आकाश गुप्ता (३० वर्ष) रा. इंदोर असे जखमी चालकाचे नाव आहे.  पाठीमागून भरधाव कार आल्याने  चालक गोंधळला व वाहन रस्त्याच्या कडेला उलटले, अशी माहिती आहे. घटनेनंतर, बुलढाणा शहर पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक एक मार्गी वळवण्यात आली. दुसरीकडे, क्रेनच्या सहाय्याने  अपघात झालेल्या वाहनाला पूर्ववत करण्यात आले. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली. सदर अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »