जालना : जालना – खामगाव रेल्वे मार्गासाठी रेल्वे संघर्ष समितीने बुधवार, 10 सप्टेंबर रोजी तीन तासांसाठी जालना बंदची हाक दिली असून बंद यशस्वी करण्यासाठी समितीच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे. आजीमाजी लोकप्रतिनिधी, व्यापारी महासंघ, विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मंगळवारी बाजारपेठेत पायदळ रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जालना : जालना – खामगाव रेल्वे मार्गासाठी रेल्वे संघर्ष समितीने बुधवार, 10 सप्टेंबर रोजी तीन तासांसाठी जालना बंदची हाक दिली असून बंद यशस्वी करण्यासाठी समितीच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे. आजीमाजी लोकप्रतिनिधी, व्यापारी महासंघ, विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मंगळवारी बाजारपेठेत पायदळ रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवार, 8 सप्टेंबर रोजी समितीचे अध्यक्ष सुभाष देविदान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच, समितीचे कार्याध्यक्ष अंकुश राऊत, महासचिव फेरोज अली मौलाना, कोषाध्यक्ष गेंदालाल झुंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, धनराज काबलिये, अशोक मिश्रा, हिरालाल पिपरिये,डॉ.राधेशाम जैस्वाल, सुरेश सदगुरे, नितीन चौधरी,शिवरतन जांगडे,रमेशचंद्र अग्रवाल, गोपाल भुरेवाल,ॲड.हरिश्चंद्र चौधरी,अशोक हुरगट, धर्मा खिल्लारे, ॲड.शिवराम सतकर, अनया अग्रवाल, शितल तनपुरे ,मनकर्णा डांगे ,नंदा पवार, डॉ.केदार करवा, प्रकाश बोडले, भरत चौधरी,संजय गायकवाड, मिर्झा अन्वर बेग,राहुल हिवराळे,गौतम वाघमारे यांची उपस्थिती होती.
बैठकीत जालना- खामगाव रेल्वे मार्ग झाल्यास जालन्याच्या व्यापारी, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग,व्यवसायाचा विकास होऊन मराठवाडा विदर्भाला जोडणारा दुवा ठरणार असल्याने व्यापारी महासंघ, राजकीय, सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तसेच रेल्वेमंत्री व केंद्र शासनास ईमेल द्वारे आपल्या भावना पोहोचवाव्यात असा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समितीच्या वतीने बाजार पेठेत पायदळ वारी काढून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाणार आहे, असे समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी, पक्षांनी दिले समर्थन
बंदच्या यशस्वीतेसाठी समितीने आ.
अर्जुन खोतकर, आ.बबनराव लोणीकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. अरविंद चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शिवसेना उ. बा. ठा. चे जिल्हाध्यक्ष भास्कर अंबेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, एम. आय. एम. चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद , बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष राहुल करनाडे यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी जालना बंदला समर्थन देत बंद मध्ये सहभागी होणार असल्याची हमी समितीला दिली.
