जालना : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना जालना शहरात गाय कापतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर केल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोक्का, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गणेश विसर्जनापूर्वी आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

जालना शहरातील अस्लम महमूद कुरेशी नामक एका खाटकाने गायीची कत्तल केली आणि हा कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, सध्या हिंदू बांधवांचा गणेशोत्सव सुरू असून गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे सोमवार, 1 सप्टेंबर रोजी दुपारी हिंदू समाजातील नागरिकांसह बजरंग दल, हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर, अक्षय गोरंट्याल यांचीही उपस्थिती होती. यावेळी अस्लम महमूद कुरेशी याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करून हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले. संबंधित खाटकावर मोक्का आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
कठोर कारवाई करा
गेल्या दोन दिवसांपासून गाय कापतानाचा व्हिडिओ अस्लम कुरेशी याने व्हायरल केला आहे. यामध्ये तो गाय कापताना दिसत आहे. तो शिवीगाळ देखील करताना दिसत आहे. त्याच्याविरुद्ध मोक्का, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. गणपती विसर्जन होण्याआधी त्याला अटक करण्याची आमची मागणी आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांना मी बोललो आहे.
– माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपा
कठोर कारवाई केली जाईल
आज सकळ हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. अस्लम कुरेशी महमूद ( रा. मंगळबाजार ) याने गोमातेची हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबाबत त्याच्यावर कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सण उत्सव काळात शांतता राखावी.
– संदीप भारती, पोलिस निरीक्षक, सदर बाजार पोलिस ठाणे.