भोकरदन : जालना येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत न्यू हायस्कूल भोकरदनच्या १७ वर्षीय मुलींनी अप्रतिम कामगिरी करत विजेतेपदाचा मान पटकावला.

भोकरदन : जालना येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत न्यू हायस्कूल भोकरदनच्या १७ वर्षीय मुलींनी अप्रतिम कामगिरी करत विजेतेपदाचा मान पटकावला.
संघातील खेळाडूंनी दमदार फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत अंतिम फेरीत विजय मिळवला. मुख्याध्यापक नंनवरे, उपमुख्याध्यापक माळी, क्रीडा शिक्षक पाटील तसेच क्रीडा शिक्षिका माने यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या टीमने हे यश मिळवले.
शालेय समितीचे अध्यक्ष आ. चंद्रकांत दानवे तसेच शालेय समितीचे सर्व सदस्य यांनी विजयी संघाचे कौतुक केले. या यशामुळे संपूर्ण न्यू हायस्कूल परिवारात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थिनींच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.