गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर नांदुऱ्या पाठोपाठ खामगावतूनही १६ तलवारी जप्त

खामगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून नांदुऱ्या पाठोपाठ खामगाव शहरातूनही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून १६ तलवारी जम केल्या आहेत. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून पोलीस आणखी कसून तपास करत आहेत.

खामगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून नांदुऱ्या पाठोपाठ खामगाव शहरातूनही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून १६ तलवारी जम केल्या आहेत. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून पोलीस आणखी कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी आज २३ ऑगस्ट रोजी मेहबूब नगर चांदमारी घरकुल भागातील रहिवाशी अब्दुल इम्रान अब्दुल जलील (२५) याच्या घरी छापा मारला असता त्याच्या घरात पोलिसांना मोठ्या आकाराच्या ७ तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी या तलवारी जात करून चौकशी केली असता त्याने या तलबारी नांदुरा येथील शेख इरफान शेख भिकारी कुरेशी याच्या मार्फत विकत घेऊन शेख नदीम शेख सरदार रा. मेहबूब नगर याच्या ऑटोतून घरी आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई नंतर शिवाजी नगर पोलिसांनी बर्ड प्लॉट व फाटकपुरा येथून सात जणांच्या घरातून ९ तलवारी जात केल्या आहेत. मोहम्मद सुलतान मोहम्मद आरीफ (२५) रा. फाटकपुरा बाच्या घरामधून पोलिसांनी ३ तलवारी जप्त केल्या. तसेच मुजाहिद खान अनिस खान (३०) फाटकपुरा बाच्या घरातून १ तलवार, बड़े प्लॉट भागातील शहनाज खान इस्माईल खान, मो. फारुख मो. शफी, इद्रीस इस्माईल गवळी, युसुफ खान अयुच खान, शेख सादीक शेख नासौर यांच्या घरातून प्रत्येकी १ तलवार जप्त करण्यात आली आहे. अशा एकूण ९ तलवारी शिवाजीनगर पोलिसांनी जप्त करून सात जणांना अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी पकडण्यात आल्याने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »