पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; भोकरदन तालुक्यातील पारध येथील घटना

जालना :  कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारध येथे शनिवार, 23 ऑगस्ट रोजी घडली. 

जालना :  कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारध येथे शनिवार, 23 ऑगस्ट रोजी घडली. 

    भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे शनिवारी

पहाटे ही घटना घडली.  समाधान अल्हाट यांनी पत्नी कीर्ती हिच्या डोक्यात धारदार पहार घालून हत्या केली व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. 

   समाधान व कीर्ती यांच्या विवाहास पाच वर्षे झाली होती. दाम्पत्याला दोन वर्षांची स्वामीनी व पाच वर्षांचा रुद्र अशी दोन लहान अपत्ये आहेत. काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते. कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी वसई, ( ता.सिल्लोड ) येथे गेली होती. समाधान अल्हाट याने तिला पाचसहा दिवसांपूर्वी जबरदस्तीने पारध येथे आणल्याचे समजते. मात्र पत्नीला ठार मारण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पारध पोलिस ठाण्याचे  सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने, पोहेकाँ प्रकाश सिनकर, शिवाजी भगत, होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना तपासा बाबत सूचना दिल्या. रात्री उशिरा पर्यंत पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 या दुर्दैवी घटनेमुळे पारध परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, निष्पाप दोन बालकांचे भवितव्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »