आमदार संतोष दानवे यांनी केली पद्मावती धरणाची पाहणी

वालसावंगी :  भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील पद्मावती धरणाची आमदार संतोष पाटील दानवे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी पाहणी करुन धरणातील पाणीसाठ्याची माहिती घेतली. पद्मावती मध्यम प्रकल्पातून भोकरदन तालुक्यातील विविध गावांसह विदर्भातील काही गावांना देखील पाणी पुरवठा करण्यात येतो.

जलजीवन मिशन अंतर्गत भोकरदन विधानसभा मतदारसंघातील गावांना मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचीही पाहणी यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली. तसेच तालुक्यात जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भविष्यात धरणाची दुरुस्ती संदर्भात याप्रसंगी चर्चा करण्यात आली.  याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी एम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उदयसिंग राजपूत, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा प्रमोद जाधव, कनिष्ठ अभियंता गणेश इंगळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, मुकेश पवार, पत्रकार हरिदास गवळी, दिनेश कोथलकर आदीसह परिसरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »