Chhatrapati Sambhajinagar Crime : पिस्तुलातून हवेत गोळया झाडतानाचा एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिटीचौक पोलिसांनी त्या तरुणाीचा शोध घेवून गजाआड केले. राखी गणेश मुरमुरे (24), रा.एन-12, असे आरोपी तरुणीचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर : पिस्तुलातून हवेत गोळया झाडतानाचा एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिटीचौक पोलिसांनी त्या तरुणाीचा शोध घेवून गजाआड केले. राखी गणेश मुरमुरे (24), रा.एन-12, असे आरोपी तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या घरातून एक पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार चाकू, गुप्ती अशी हत्यारे जप्त केली असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी कळविली आहे.
एका तरुणीचा पिस्तुलातून हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तिची शोध मोहिम राबवली असता, भडकलगेट परिसरात ती तरुणी येणार असल्याची माहिती सिटीचौक पोलिसांना मिळाली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पेालिस आयुक्त संपत शिंदे, सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनिषा हिवराळे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, पोलिस अंमलदार राजेंद्र साळुंके, मनोहर त्रिभुवन, नितीन घोडके, आनंद वाहुळ, महिला पोलिस शिपाई राजपूत, निर्मला वानखेडे, पंडित, पवार, बबन इप्पर, टेकाळे, कांबळे आदींच्या पथकाने भडकलगेट परिसरात सापळा रचून रविवार, 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची अंगझडती घेतली असता तिच्याजवळ एक धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी पिस्तूलाविषयी विचारले असता ते घरी असल्याचे सांगितले.
पोलिसांनी हडको एन-12 परिसरातील स्वामी विवेकानंदनगरात असलेल्या राखी मुरमुरे हिच्या घरातून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, गुप्ती आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी राखी मुरमुरे हिच्याविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.