खामगाव : विशेष बाल प्रकरणात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ यांनी आरोपी योगेश संतोष आवारे (रा. टेंभुर्णा) याला दोषी ठरवत २० वर्षांचा सश्रम कारावास व ८० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.

खामगाव : विशेष बाल प्रकरणात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ यांनी आरोपी योगेश संतोष आवारे (रा. टेंभुर्णा) याला दोषी ठरवत २० वर्षांचा सश्रम कारावास व ८० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.
हा गुन्हा पोलीस स्टेशन खामगाव अंतर्गत ४ जून २०२२ रोजी नोंदविण्यात आला होता. आरोपीने घटनेच्या वेळी अवघ्या १० वर्षांच्या अल्पवयीन बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित करून २८ जानेवारी २०२५ पासून साक्ष नोंदविण्यास सुरुवात केली. सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडित बालक, त्याची आई, वैद्यकीय अधिकारी, दुकानदार, जप्ती पंचनाम्याचे साक्षीदार तसेच घटनास्थळावरील साक्षीदार यांचा समावेश होता. सर्व साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर विश्वासार्ह ठरली. तपासादरम्यान तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी व अमोल कोळी यांनी निष्पक्ष व वस्तुनिष्ठ तपास केला. तसेच पीडित बालकाच्या जातीचे प्रमाणपत्र संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून निर्गमित असल्याचा ठोस पुरावा देखील न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाने सुनावलेली सश्रम कारावासाची शिक्षा एकत्रितपणे भोगावयाची आहे. आरोपी हा ८ जून २०२२ पासून बुलढाणा जिल्हा कारागृहात असल्याने, त्या कालावधीचा लाभ शिक्षेमध्ये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठोठावण्यात आलेल्या ८० हजार रुपयांच्या दंडापैकी ७५ हजार रुपये पीडित बालकास देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता उदय आपटे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंदा शिंदे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर काळे यांनी कोर्ट पैरवीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
अशी सुनावली कलमनिहाय शिक्षा
कलम ४, पोक्सो अधिनियम २० वर्षे सश्रम कारावास व २५,००० दंड, कलम ६, पोक्सो अधिनियम २० वर्षे सश्रम काराबास व ३०,००० दंड, कलम 3(7)(4) अजा.ज.अ.प्र.का. २० वर्षे सश्रम कारावास व २५,००० दंड आणि कलम ५०६, भादंवि ६ महिने कारावास व ५,००० दंड
कारावास व ८० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.
