drugs worth crores seized in Akola : मोठी बातमी, अकोल्यात कोट्यवधीचे अमलीपदार्थ जप्त

drugs worth crores seized in Akola

drugs worth crores seized in Akola :  बार्शिटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागाव रोडवर सुरू असलेल्या अंमली पदार्थ बनविण्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थ ईफीड्राईन बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे रसायन, अमली पदार्थ ईफीड्राईन ५.५४८ कि.लो. अंदाजे किमत एक कोटी ३८ लाख ७० हजार रुपये आणि मालवाहू वाहन, असा एकूण २ कोटी ३८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

drugs worth crores seized in Akola

अकोला : बार्शिटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागाव रोडवर सुरू असलेल्या अंमली पदार्थ बनविण्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थ ईफीड्राईन बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे रसायन, अमली पदार्थ ईफीड्राईन ५.५४८ कि.लो. अंदाजे किमत एक कोटी ३८ लाख ७० हजार रुपये आणि मालवाहू वाहन, असा एकूण २ कोटी ३८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरूद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार पोलीस यंत्रणा विविध मोहीम राबवत आहे. याच दरम्यान पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना बार्शिटाकळी हद्दीतील महागाव रोडवर मोहम्मद शफी यांच्या बंद असलेल्या जिनींगमध्ये काही लोक अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पंचासमक्ष छापा टाकत कारवाई केली. कारवाई दरम्यान दोन खोल्यांमध्ये दोन व्यक्ती वेगवेगळ्या रसायनीक द्रव्यावर रासायनीक प्रक्रिया करुन पांढऱ्या रंगाचे स्पटीका सारखा पदार्थ तयार करत असल्याचे आढळून आले.

कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपी अदील मोहम्मद शमीम अन्सार ( ३६ वर्ष), पवन माणीक मुददनर (३० वर्ष) ( दोन्ही राहणार वसई मुंबई) यांच्यासह त्यांना स्थानिक पातळीवर मदत करणारे निसार नियाजी मुख्तार नियाजी ( ४५ वर्ष, रा. अकोट फाईल अकोला), मोहम्मद इरफान मो. युसुफ (४० वर्ष,रा. गंगा नगर अकोला), फिरोज खान शब्बीर खान (५० वर्ष रा. गंगा नगर अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरूद्ध एनडीपीएस कायदा १९८५ कलम २२ (सी) आर/ डब्ल्यू. ८ (सी), २५, २९ प्रमाणे बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात स.पो.नि विजय चव्हाण करणार आहेत.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शंकर शेळके, सहाय पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार दशरथ बोरकर, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, फिरोज खान, उमेश पराये, आकाश मानकर, धिरज वानखडे, मो आमीर, अभीषेक पाठक, सतीश पवार, स्वप्नील चौधरी, लिलाधर खंडारे, भास्कर धोत्रमो. अन्सार, अशोक सोनोने, गोकुळ चव्हान, गणेश धुंपटवाड, सदीप तवाडे, सुलतान पठान अब्दुल माजीद, महेद्र मलीये, अविनाश पाचपोर, रविद्र खंडारे, अमोल दिपके, वसिमोद्दीन, स्वप्निल खेडकर, खुशाल नेमाडे आयकार विभाग चे अनिल इचे, लक्ष्मण सिरसाट, सुनिल दिपकवार, विजय गुल्हाणे, विनोद ठाकरे, प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, रामकिसन डोईफोडे, यांनी केली.

मुख्य आरोपी विरूद्ध यापुर्वी गंभीर गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी अदील मोहम्मद शमीम अन्सार याचे विरुध्द विरुध्द २०१४ मध्ये हैद्रबाद येथील आतापुरा पोलीस स्टेशन तसेच २०१७ मध्ये मुंबई येथील युनीट ३ येथे ईफीड्राईन ( EPHEDRINE) अमली पदार्थ तयार करण्याचा गुन्हा नोंद असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »