MLA Gaikwad statement on Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य मागे घेईल, पण त्यांनी आधी चैत्यभूमि किंवा दीक्षाभूमि येथे जावून माथा टेकवावा, आरक्षण विरोधी व्यक्तव्य केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी माघावी असे ते म्हणाले.
बुलढाणा : परदेशात जावून आरक्षण संपविण्याची भाषा राहुल गांधी यांनी केली होती. मुळात, राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत. त्यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देणार ! असे वादग्रस्त वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी केले होते. यानंतर, राज्यभरात कॉँग्रेस आक्रमक झाली नव्हेतर अनेक कॉँग्रेस नेत्यांनी आ. गायकवाड यांच्या वक्तव्याविरोधात खडसून समाचार घेतला होता. आता मात्र, आ. गायकवाड यांनी नवी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य मागे घेईल, पण त्यांनी आधी चैत्यभूमि किंवा दीक्षाभूमि येथे जावून माथा टेकवावा, आरक्षण विरोधी व्यक्तव्य केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी माघावी असे ते म्हणाले.
आ.संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त विधानांनी चर्चेत आले आहेत. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या व्यक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा आसूड उगारला आहे. मात्र, केलेल्या व्यक्तव्यावर ठाम राहुन आपली भूमिका योग्य असल्याचे तसेच एक देशभक्त नागरिक या नात्याने केलेले व्यक्तव्य योग्य आहे, अशी भूमिका आ. गायकवाड यांनी मांडली आहे. 16 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील शहर पोलीस ठाण्यात कॉँग्रेसने ठिय्या आंदोलन केले होते. आ. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी आ. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.