dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थावर आघात! ‘अति तिथे माती’ चा बुलढाणेकरांना साक्षात्कार होईल! आ. गायकवाड – आ. महाले वादावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया..

बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या वाकयुद्धानंतर कथित राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी यावर भाष्य केले आहे. सत्ताधारी मित्र पक्षातील  वादावर सपकाळ यांनी टीका केली आहे. 

बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या वाकयुद्धानंतर कथित राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी यावर भाष्य केले आहे. सत्ताधारी मित्र पक्षातील  वादावर सपकाळ यांनी टीका केली आहे. 

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 

“शिवसेना आणि भाजप यांच्यातील कथित संघर्ष म्हणजे ‘नुराकुस्ती’ आहे.  मी तुला मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर! असे हे सुरू आहे.  मुळात खरेच भांडत असाल तर सत्तेतून बाहेर पडण्याचा किंबहुना सत्तेचा संघर्ष स्पष्ट व्हायला हवा होता.  मात्र भ्रष्टाचार कोणी किती करायचा? कुणी किती दमदाटी करायची?  अशा हेकीखोरीची झालर या संपूर्ण वादाला आहे, असे मला वाटते. वाद पक्षांतर असो की मित्र पक्षाचा असो, भाषा ही सभ्यतेची असली पाहिजे. संस्कृती जोपासली पाहिजे, मात्र विकृती जर पुढे येत असेल तर संपूर्ण जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्याच्याबाबत ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. मात्र अति तिथे माती, या म्हणीचा साक्षात्कार लवकरच बुलढाणेकरांना आल्याशिवाय राहणार नाही” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाले –  गायकवाड वादात आपले मत मांडले आहे. 

आ. गायकवाड यांनी दिलेल्या शुभेच्छाबाबत..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी समाजमाध्यमांवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्याचे दिसून आले होते. आ. गायकवाड यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल विचारले असता, सपकाळ म्हणाले की, “शुभेच्छा दिल्यानंतर रिटर्न गिफ्ट देण्याची पद्धत आहे. त्यामुळे, मी एवढेच सांगेल की, उद्यापासून गणपती बसणार असून सुबुद्धी मिळावी, अशा माझ्या शुभेच्छा आहे, असे सपकाळ म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top