मुंबई : आज जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळ्यांवर दबाव आहे. ही परिस्थिती अनेक महिन्यांपासून कायम आहे आणि एप्रिल ते जूनची तिमाही विशेषतः आव्हानात्मक राहिली आहे. अशा वेळी, जेव्हा भारत 7.8 टक्के दराने विकास करतो, तेव्हा जगाला एक नवीन आत्मविश्वास मिळतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन
मुंबई : आज जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळ्यांवर दबाव आहे. ही परिस्थिती अनेक महिन्यांपासून कायम आहे आणि एप्रिल ते जूनची तिमाही विशेषतः आव्हानात्मक राहिली आहे. अशा वेळी, जेव्हा भारत 7.8 टक्के दराने विकास करतो, तेव्हा जगाला एक नवीन आत्मविश्वास मिळतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, यूपीआय ही भारताच्या विकासाची गाथा आहे. 10 वर्षांपूर्वी बँक खाते बोटांच्या टोकावर आणण्यावर कोणाचाही विश्वास नव्हता, पण आज हे वास्तव बनले आहे. ते म्हणाले मला खूप आनंद आहे की आज इथे आणखी एक हॅट्ट्रिक साधली गेली आहे. पहिली हॅट्ट्रिक 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यावर लागली होती, आणि ही हॅट्ट्रिक तुमच्या सर्वांमध्ये येण्याशी संबंधित आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये हे माझे सलग तिसरे वर्ष आहे. ही हॅट्ट्रिक दर्शवते की विकसित भारतासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात, तुमचे काम किती महत्त्वाचे आहे.
बोगस पीएमओ अधिकाऱ्यासह बंदूकधारी ‘बॉडीगार्ड’ ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे कुर्ला संकुलातील नीता अंबानी कल्चरल सेंटरमधील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ या कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाची बनावट ओळख दाखवून घुसू पाहणाऱ्या बोगस पीएमओ अधिकाऱ्यासह बंदूकधारी बॉडीगार्डला अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाचे नाव रोहन पारिख असून तो २४ वर्षांचा आहे. त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून वावरणाऱ्या तरुणाकडे बंदूक आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर सुरक्षा विकसित करण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिनटेक क्षेत्राला युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ची जागतिक व्याप्ती वाढवण्याचे, इतर देशांतील स्थानिक पेमेंट प्रणालींशी ते जोडण्याचे आणि परदेशस्थ भारतीयांसाठी पैसे पाठवण्याचा खर्च कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. यूपीआय प्लॅटफॉर्म आता ११ देशांमध्ये कार्यरत आहे आणि सिंगापूरच्या स्थानिक पेमेंट प्रणालीशी देखील जोडले गेले आहे. गेल्या दशकात, यूपीआय देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रिअल-टाइम पेमेंट प्लॅटफॉर्म बनले आहे. पंतप्रधानांनी फिनटेक समुदायाला अत्याधुनिक सायबर सुरक्षा उपाययोजना विकसित करण्याचे आवाहनही केले.

