वाशिम : मराठा सेवा संघाच्या स्थापना दिनानिमित्त रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. डॉ. नवनाथ घाडगे यांच्या सामाजिक, संघटनात्मक व समाजहिताच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. डॉ. नवनाथ घाडगे यांचा होणार गौरव
वाशिम : मराठा सेवा संघाच्या स्थापना दिनानिमित्त रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. डॉ. नवनाथ घाडगे यांच्या सामाजिक, संघटनात्मक व समाजहिताच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या गौरव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगनायक पुरुषोत्तम खेडेकर राहणार आहेत.
प्रमुख उपस्थितीमध्ये निर्मलकुमार देशमुख, संस्थापक सचिव, मराठा सेवा संघ रेखाताई खेडेकर, माजी आमदार तथा ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा सेवा संघ इंजि. डॉ. विजय घोगरे, प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ कामाजी पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ सीमाताई बोके, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड ज्ञानेश महाराव, प्रसिद्ध विचारवंत, लेखक व पत्रकार इंजि. चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त, मुंबई महानगरपालिका (से.नी.) आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी वाशिम जिल्ह्यातून मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबई कडे रवाना झालेले आहेत. तरी या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. वसंतराव अवचार, प्रा. भरत आव्हाळे, महिला उपाध्यक्ष सौ. वैशाली आरू, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, विभागीय अध्यक्ष सुरेखा आरू, जिल्हाध्यक्षा सविता बोरकर, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष वाकुडकर,रिसोड तालुकाध्यक्ष शिवाजी कव्हर, मालेगाव तालुकाध्यक्ष तेजराव पाटील, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष गोपाल गावंडे, कारंजा तालुकाध्यक्ष राजेंद्र मोडक यांनी केले आहे. तसेच संभाजी ब्रिगेडचे गणेश सुर्वे, श्रीकृष्ण शिंदे, गजानन खंदारे, विकास देशमुख, प्रा.इस्माईल खा. पठाण, नितीन जाधव, पंढरी महाराज काळबांडे, अजय गवारगुरु आदी पदाधिकाऱ्यांनीही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थापना दिन व गौरव समारंभात सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.