dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रिसोडमध्ये बंदला प्रतिसाद

रिसोड : नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ तसेच महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. २३) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन पार पडले. आंदोलनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाचा निषेध करण्यात आला तसेच संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकारावर भर देण्यात आला.  यावेळी महाराष्ट्र बंदला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला, युवक तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविताना संविधानिक मार्गाने लोकशाही हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे रिसोड तालुकाध्यक्ष महेश तिडके यांनी केले. वंचित बहुजन युवा आघाडी, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top