छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय रोडवरील एका वडापावच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला लाग लागल्याची घटना बुधवार, 10 जून रोजी घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत दुकानातील एक लॅपटॉप, दोन एसी व इतर साहित्य मिळून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली आहे.

घाटी रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोडवरील ज्युबली पार्क चौकात वडापावचे दुकान असून बुधवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला आग लागली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम, हरिश्चंद्र पवार, एल.पी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक जवान अजिंक्य भगत, सचिन फुले, संकेत निकाळजे, अक्षय नागरे, रवी दुधे, रवी हरणे, रामेश्वर बमणे, सय्यद अजझर, योगेश दुधे, समीर शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत वडापावच्या दुकानातून एक स्फोट झालेला सिलेंडर आणि एक निकामी सिलेंडर बाहेर काढला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. वडापावच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.