dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी  

कारंजा : कारंजा-मानोरा मार्गावरील विद्यारंभ शाळेजवळ बुधवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले. 

प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या वेळी कारंजा-मानोरा मार्गावर वाहतुकीची वर्दळ सुरू असताना हा अपघात घडला. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात प्रेमचंद सहारे (वय ५२, रा. मध्यप्रदेश) आणि गजानन भोपळे (वय ५०, रा. इंझोरी) हे गंभीर जखमी झाले. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी सावडण्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना सुरक्षित स्थळी हलविले. अपघाताची माहिती मिळताच आई एकविरा व दादाजी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कारंजा येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती अजय ढोक यांनी शिवम खोंड यांना दिली. मदतकार्यात विजय पांढरे, शाम घोडेस्वार, संदेश मेश्राम आणि शिवम खोंड यांनी सहकार्य केले. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top