बुलढाणा : कथित बदनामीकारक वक्तव्य प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराजे शिंदे यांनी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना वकील असीम सरोदे यांच्यामार्फत १०० कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. यावर, आता आमदार संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विजयराज शिंदेंवर केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचा दावा आमदार गायकवाड यांनी केला. ते म्हणाले, न्यायालयीन मार्गाने आम्हीही उत्तर देऊ, मी केलेली विकास कामांमुळे जळफळाट झाल्याने अशाप्रकारे नोटीस पाठवण्यात आली आहे. विजयराज शिंदे यांनी त्यांच्या ३५ वर्षाच्या कार्यकाळात १० हजार कोटींची कमाई केली असेल, म्हणून त्यांनी माझ्यावर शंभर कोटींचा दावा ठोकला. शिंदे यांच्या आश्रम शाळेचा उल्लेख करत आदिवासींच्या मुलांना उपाशी ठेवल्याने अनेक मोर्चे देखील निघाले होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वकील असीम सरोदे यांच्या विषयी बोलताना “मागे प्रकाश आंबी प्रकरणापासून मला हे असीम सरोदे, अर्धे हिंदुस्तानी अर्धे पाकिस्तानी हे भूत पाहायला मिळाल्याची सडकवून टीका आमदार गायकवाड यांनी केली.