dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालना बसस्थानक परिसरातून मोटारसायकल लंपास; घटना चोरटे सीसीटीव्हीत कैद

जालना : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून एका युवकाची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.

जालना : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून एका युवकाची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख मुस्तकीम मुसा कुरेशी (वय ३०, रा. मदिना चौक, जुना जालना) हे १३ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजेच्या दरम्यान आपल्या वडिलांना बसमध्ये बसविण्यासाठी जालना बसस्थानक परिसरात आले होते. त्यांनी आपली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच २१ बीई ५३७८) बसस्थानक परिसरात उभी केली होती. काही वेळानंतर परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

परिसरात शोध घेतल्यानंतर मोटारसायकल चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेली मोटारसायकल लाल-काळ्या रंगाची असून तिची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी मोटारसायकल चोरी करणारे संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली असून त्याआधारे पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.

या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात १५ मे रोजी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, जालना बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार प्रवासी व नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. परिसरात दारुड्यांची व नशेखोरांची वाढती वर्दळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top