dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

तीन वाहनांचा विचित्र अपघात; ट्रॅक्टर चालक ठार

कामरगाव : अमरावती-कारंजा राष्ट्रीय महामार्गावर कामरगावजवळ शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर लक्झरी बसमधील क्लीनर जखमी झाला. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

लक्झरी बसची ट्रॅक्टरला धडक, ट्रकवर आदळल्याने दुर्घटना

कामरगाव : अमरावती-कारंजा राष्ट्रीय महामार्गावर कामरगावजवळ शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर लक्झरी बसमधील क्लीनर जखमी झाला. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ही घटना रात्री सुमारे १.४५ वाजताच्या सुमारास घडली. महामार्गावरील ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर (आरजे-01 5104) रस्त्यावरून जात असताना अमरावतीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या   लक्झरी बसने (एमपी-13 पी-4899) ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रॅक्टरचा ताबा सुटून तो समोरून येणाऱ्या ट्रकवर (एमएच-28 बीबी-8555) आदळला. या अपघातात ट्रॅक्टर चालक विलास देविदास पवार (वय ४०, रा. बोदेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे तुकडे होऊन काही भाग रस्त्यावर विखुरला होता. दरम्यान, लक्झरी बसमधील क्लीनर निलेश हरिदास छेडकर (रा. खरबी) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top