dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पतीने केला पत्नीचा निर्घृण खून; डोक्यात लोखंडी रॉडने वार करून केली हत्या

खामगाव :  येथील रेल्वे गेट परिसरात राहणाऱ्या एका  विवाहितेचा पतीनेच लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून  केल्याची घटना 15 मे च्या रात्री बारा वाजता उघडकीस आली.

खामगाव येथील रेल्वेगेट परिसरातील घटना; पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक

खामगाव :  येथील रेल्वे गेट परिसरात राहणाऱ्या एका  विवाहितेचा पतीनेच लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून  केल्याची घटना 15 मे च्या रात्री बारा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे.  सविता प्रकाश सोळंके असे मृत्यू महिलेचे नाव आहे.
    आरोपी पती प्रकाश सोळंके यांनी रागाच्या भरात मी सविता सोळंके हीच्याशी वाद घालून तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडणे सपासप वार करून तिची हत्या केली. घटनेची माहिती परिसरात कळताच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांना माहिती मिळतात पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतक सविता सोळंकेचा मृतदेह छिन्न बिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तातडीने आरोपी पती प्रकाश सोळंके यास अटक करून पोलीस स्टेशनला आणले. यावेळी पोलिसांनी नेहमीप्रमाणे मदतीसाठी रुखमाई फाउंडेशनचे अध्यक्ष खामगाव रत्न संजय खंडेराव यांना बोलावून घेतले घटनास्थळी पोहोचून संजय खंडेराव व त्यांचे सहकारी मित्र रमेश अवचार यांनी मृताचा मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये टाकून सामान्य रुग्णालय खामगाव येथे पोहोचविला. पुढील तपास शहर पोलीस स्टेशन खामगावचे ठाणेदार पवार हे करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top