छत्रपती संभाजीनगर : देशभरातील नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि एन टी ए संस्थेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरुवार, 14 मे रोजी क्रांती चौक येथे एनएसयुआयतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या या खेळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरलेली एन टी ए संस्था रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

क्रांतीचौकात हे आंदोलन एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील, राज्य उपाध्यक्ष शादाब शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. निलेश अंबेवाडीकर, बाबासाहेब पवार, अशोक डोळस, अतिश पितळे आणि प्रकाश सानप आदींची उपस्थिती होती. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी आकाश रगडे, मध्य विधानसभा अध्यक्ष एजाज शेख, झईद शेख, सुमेध गायकवाड, उमर पटेल, निखिल गायकवाड, सृजन गावडे, ऋषी डुकळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.