पुणे : बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, यंदाही बारावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचे बघायला मिळत आहे. यंदा 89.79 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कोकण विभाग अव्वल आहे तर लातूर पिछाडीवर दिसून येत आहे.

नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे. लातूल विभागाला मोठा दणका बसला. लातूर विभागाचा सर्वात कमी निकाला लागला आहे.
असा आहे विभागनिहाय निकाल…
कोकण 94.14
पुणे 91.25
अमरावती 90.92
नाशिक 90.72
मुंबई 90.08
कोल्हापूर 89. 97
छत्रपती संभाजीनगर 88.68
नागपूर 88.67
लातूर 84.14