dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खामगावात रात्री घडला खुनी थरार : डीजे वर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून खामगावात युवकाचा खून 

खामगाव : शहरातील बर्डे प्लॉट येथे 25 एप्रिल रोजी रात्री डीजे वर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसन थेट खूनी थरारत झाले. यामध्ये चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार गेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान (23) रा. बर्डे प्लॉट असे मृतक युवकाचे नाव आहे. 

बर्डे प्लॉट मधील घटना ; पोलिसांचा कडक बंदोबस्त 

खामगाव : शहरातील बर्डे प्लॉट येथे 25 एप्रिल रोजी रात्री डीजे वर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसन थेट खूनी थरारत झाले. यामध्ये चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार गेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान (23) रा. बर्डे प्लॉट असे मृतक युवकाचे नाव आहे. 

 बडे प्लॉट भागातील स्मशानभूमीच्या जवळ एका लग्न समारंभामध्ये डीजे सुरू असताना युवक नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असताना त्याचा एका युवकाला धक्का लागला या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील चार ते पाच जणांनी शोएब खान अमीन खान यांच्यासोबत वाद घातला आणि चार ते पाच जणांनी संगणमत करून शिवाय खान याचे वर धारदार शस्त्र आणि लाट्याकाट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त लावला असून अद्याप पर्यंत गुन्हा दाखल केला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top