dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समृद्धी महामार्गावर स्कार्पिओचा टायर फुटला;  पाच जण  जखमी

कारंजा : समृद्धी महामार्गवर रविवारी सकाळी स्कार्पिओ वाहनाचा समोरील टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन डिव्हायडरला धडकून पलटी झाले. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कारंजा : समृद्धी महामार्गवर रविवारी सकाळी स्कार्पिओ वाहनाचा समोरील टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन डिव्हायडरला धडकून पलटी झाले. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील वापी येथे जाण्यासाठी काशी विश्वनाथवरून निघालेली स्कार्पिओ (क्र. जीजे ०५ जेओ १३५३) सकाळी साडेसातच्या सुमारास चॅनल क्रमांक १६७ वर आली असता अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली व एक पलटी झाली. या अपघातात शोएब खान (वय ३५), खुशबू निसा शोएब खान (वय ३०), अरमान खान (वय १२), जिशान खान (वय १०) व  येराना खान (वय ८, सर्व रा. वापी, गुजरात) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग १०८ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पायलट आतिश चव्हाण व डॉ. नीलेश राठोड यांनी जखमींना प्राथमिक उपचार देत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मस्के यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर केले. या मदतकार्यात श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख, समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार, आई एकवीरा रुग्णवाहिकेचे विनोद खोड, कक्षसेवक विजय शिरसाठ तसेच अधिपरिचारिका पल्लवी यांनीही सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top