नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या ३५ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने तिसऱ्या षटकात दिल्लीला मोठा धक्का दिला. सलामीवीर केएल राहुलने नितीश राणासोबत पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले आणि १० षटकांत संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. त्यानंतर लगेचच, केएल राहुलने एक शानदार शतक झळकावून एक उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने नाबाद १५२ धावांची खेळी करत नवा इतिहास लिहिला.

केएल राहुलने १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एक शानदार चौकार मारुन आपले शतक पूर्ण केले. त्याने ४७ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करून आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली. हे केएलचे आयपीएलमधील सहावे शतक आहे. गेलच्या नावावरही आयपीएलमध्ये तेवढीच शतके आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूच्या विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी केएल आता फक्त दोन शतके दूर आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहलीने सर्वाधिक ८ शतके झळकावली आहेत.
टी-२० क्रिकेटमधील हे केएलचे आठवे शतक आहे. यामुळे त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत ‘हिटमॅन’ची बरोबरी केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर आता प्रत्येकी आठ शतके आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहली आणि अभिषेक शर्मा यांच्या नावावर असून, दोघांनीही नऊ शतके झळकावली आहेत.