छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाविरुध्द शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार, 25 एप्रिल रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध केला. तसेच बागेवर बाबा यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

क्रांतीचौकात केले जोडेमारो आंदोलन, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाविरुध्द शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार, 25 एप्रिल रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध केला. तसेच बागेवर बाबा यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करुन जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, मोईन इनामदार, गंगापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड, विश्वास औताडे, सरचिटणीस राहुल सावंत, असदउल्ला शकील, इंजि. इफ्तिकार शेख, डॉ. सिकंदर शेख, योगेश थोरात, दिलीप भोसले, संजय धर्मरक्षक, रेखा वाहतुळे, गौरव जैस्वाल, बाबासाहेब पवार, इरफान पठाण, शेख फय्याजोद्दीन, प्रकाश सानप, कल्याण चव्हाण, पप्पूराज ठूबे, सलीम इनामदार, सलमान खान, रमेश काळे, अजय डिडोरे, शिरीष चव्हाण, शुभम साळवे आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.