बुलढाणा : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने, यावरून मोठे रणकंदन सुरू झाले आहे. बुलढाण्यात छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर ‘वंचित’ने ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन सुरू केले आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘जे महिलांचा आदर करू शकत नाही त्यांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही’! असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येत असून, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आणि विचार मांडण्याचे प्रयत्न असल्याचे सांगत गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाला समर्थन दिले जात आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह बुलढाण्यात या पुस्तकाचे सामूहिक वाचन सुरू केले. दरम्यान, माध्यम प्रतिनिधी समोर आपले प्रतिक्रिया मांडत असताना ते आक्रमक होताना दिसले. आमदार संजय गायकवाड यांनी ९ मिनिटाच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ३८ वेळा शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर, पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई आणि पत्नी संदर्भात त्यांनी चुकीची भाषा वापरली, त्यामुळे जे, महिलांचा सन्मान करू शकत नाही त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचाही अधिकार नाही, आमदार गायकवाड हे महाराष्ट्राचे जेम्स लेन असल्याची घनाघाती टीकाही त्यांनी केली.