dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘बाबासाहेब  सामाजिक सुधारणेच्या  मंदिराचे  ‘कळस’ : प्रा. डॉ. अनंत शिरसाट यांचे विचार 

बुलढाणा: संपूर्ण मानव जातीला बंधुत्वाचा संदेश देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समाज सुधारणिक मंदिराचे कळस आहेत. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे, आजच्या आभासी जगतात महापुरुषांच्या चळवळीचे विचार जोपासणे अत्यंत गरजेचे आहे, असे विचार प्रा. डॉ. अनंत शिरसाट यांनी मांडले. 

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून महामानवाला अभिवादन 

बुलढाणा: संपूर्ण मानव जातीला बंधुत्वाचा संदेश देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समाज सुधारणिक मंदिराचे कळस आहेत. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे, आजच्या आभासी जगतात महापुरुषांच्या चळवळीचे विचार जोपासणे अत्यंत गरजेचे आहे, असे विचार प्रा. डॉ. अनंत शिरसाट यांनी मांडले. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भीम जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. 

 मंगळवार, १४ एप्रिल रोजी  बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत होते. तर प्रमुख उपस्थितीत, अस्थिरोग तज्ञ डॉ. विवेक मोरे, ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख हे उपस्थित होते.  सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकातून रणजीतसिंग राजपूत यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा उल्लेख करत, पत्रकार म्हणून जयंती साजरी करणे हे आद्यकर्तव्य असल्याचे नमूद केले. त्यानंतर, प्रा. डॉ. अनंत शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित पत्रकारांना आवाहन केले, की  शोषित व पिढीतांसाठी आपली लेखणी झिझवा. महापुरुषांना केवळ जाती धर्माच्या चौकटीत न बांधता, त्यांचे विचार जोपासून खऱ्या अर्थाने समाज हिताचे कार्य करणे  गरजेचे आहे.  आजरोजी  सामाजिक अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. यातून मुक्त होण्यासाठी विचारांवर कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व महापुरुषांनी मानव जातीला समानतेचा विचार दिला आहे. त्यानुसार भेदाभेद न मानता माणूस म्हणून आपण एकत्रित आलो पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गणेशे यांनी डॉ.  बाबासाहेबांवर आधारित कविता सादर केली, आणि मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिषेक वरपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top