dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवैध होर्डिंग काढताना शॉक लागून मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुकुंदवाडी परिसरातील घटना, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर :  मुकुंदवाडी परिसरातील अवैध होर्डिंग काढत असतांना विजेचा शॉक लागून मनपा कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी विजेच्या तारेजवळ अवैधरित्या होर्डिंग लावणाऱ्याविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल दिनकर जाधव (27 वर्ष) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मनपा सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर रवींद्र रणधीर रिडलॉन (38 वर्ष) हे गंभीर जखमी झाले. शहरात धार्मीक सण, महोत्सव, नेत्यांच्या स्वागताचे, राजकारण्याचे वाढदिवस यासह खासगी संस्था संघटनांचे हजारो अनधिकृत बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर बहाद्दरांनी शहरातील चौक तर रंगवले आहेच रस्त्यावरील सिग्नलही सोडले नाहीत. सिग्नलला बॅनरने असा विलखा घातला आहे की, वाहनधारकांना सिग्नल दिसतच नाहीत. गेल्याच आठवड्यात महापौर समीर राजूरकर यांनी शहरातील बॅनर हटविण्याचे आदेश मनपा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी महापालिकेने कारवाई सुरू केली. मुकुंदवाडी परिसरात हनुमान मंदिरावरील होर्डिंग काढताना लोखंडी फ्रेम 33 केव्ही वीज तारेच्या संपर्कात आल्याने विजेच्या जोरदार धक्क्याने अमोल जाधव हे बेशुध्द झाले तर रवींद्र रिडलॉन हे गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अमोल जाधव यांना तपासून मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top